गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून तीन ग्रामस्थांची हत्या !

0

गडचिरोली- गडचिरोलीतील भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून तीन ग्रामस्थांची हत्या केली आहे. कोसफुंडी फाट्याजवळ सोमवारी रात्री ही घटना घडली आहे. मालू दोगे मडावी, कन्ना रैनू मडावी आणि लालसू मासा कुडयेटी अशी हत्या झालेल्या ग्रामस्थांची नावे आहे.

छत्तीसगडमधील सुमारे १५० दहशतवादी गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कोसफुंडी फाट्याजवळील कसनासूर गावात गेले. त्यांनी ग्रामस्थांना शस्त्रांचा धाक दाखवून गावाबाहेर काढले. यानंतर त्यांनी पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून तीन ग्रामस्थांची निर्घृणपणे हत्या केली. हत्येनंतर नक्षलवाद्यांनी गावात बॅनरही लावले. २१ एप्रिल २०१८ रोजी कसनूर- तुमिरगुण्डा येथे पोलिसांनी ४० नक्षलवाद्यांना मारले. या घटनेसाठी दोषी असलेल्या तीन ग्रामस्थांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. ते तिघेही पोलिसांचे खबरी म्हणून काम करत होते असे लिहिलेले आहे.