जळगाव प्रतिनिधी ।
रेडक्रॉसमार्फत रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाउन यांच्या सहकायनि निक्षय मित्र योजने अंतर्गत टी. बी. प्रस्त रुणांना पोषक आहार कीट वितरीत करण्यात आले. याप्रसंगी रोटरी क्लब जळगाव निचे अध्यक्ष मनोज पाटील, सचिव राजेंद्र कुलकर्णी, मेडिकल चेअरमन डॉ. अपर्णा मकासरे, असिस्टंट दिलीप गांधी, देणगीदाते भालचंद्र पाटील, रमेशचंद्र जाजू, सुनंदा देशमुख, अनिल अग्रवाल, अॅड. सुनील चोरडिया, रेडक्रॉस केंद्राचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, आपती व्यवस्थापन चेअरमन सुभाष सांखला, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण तिवारी, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेश सुरळकर, क्षयरोग केंद्राचे जिल्हा समन्वयक कमलेश अमोदेकर, दीपक नादेडकर, नितीन बाविस्कर आदी उपस्थित होते.
रोटरी क्लब का मिडटाऊनच्या सेवा उपक्रमांची निक्षय मित्र योजनेची माहिती डॉ. अपर्णा यांनी प्रास्ताविकातून दिली. तसेच दिलीप गांधी यांनी रेडक्रॉस राबवित असलेल्या उपक्रमांचे कौतुक करीत भविष्यातही रोटरीमार्फत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी रेडक्रॉसमार्फत सुरु असलेल्या सर्व उपक्रमांची माहिती देऊन नियमित रक्तदान शिबीर आयोजित करण्याबाबत आवाहन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व टी. बी. ग्रस्त रुग्णांना पोषक आहार फीट वितरीत करण्यात आले.