मुंबई- आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांचा बहुचर्चित ‘ठग्स ऑफ हिन्दुस्तान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण प्रदर्शनानंतरच्या पहिल्याच दिवशी समीक्षकांनी या चित्रपटावर नकारात्मक टिप्पणी केली. आमिर व अमिताभच्या ‘ठग्स ऑफ हिन्दुस्तान’ने चाहत्यांना ठगवीले अशी प्रतिक्रिया येत आहे अशा नकारात्मक टिप्पणीनंतरही बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. केवळ चारच दिवसांत या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
नकारात्मक टिपण्णीनंतर ताणली गेलेली उत्सुकता आणि धमाकेदार प्रमोशन याचा जबरदस्त फायदा या चित्रपटाला मिळाला आहे. याचाच परिणाम म्हणजे, पहिल्याच दिवशी ‘ठग्स ऑफहिन्दुस्तान’ला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ५२.२५ कोटींची कमाई केली. नाही म्हणायला दुसºया दिवशी चित्रपटाच्या कमाईत ५० टक्के घट झाली. पण दुस-या दिवशी चित्रपटाने २८.२५ कोटींचा गल्ला जमवला. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने २२.७५ कोटी कमावले.
हिंदी भाषेतील ‘ठग्स ऑफ हिन्दुस्तान’ने तीन दिवसांत एकूण १०१.७५ कोटी कमावले आणि तामिळ, तेलगू या भाषेतही या चित्रपटाने १०५ कोटींचा बिझनेस केला. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने १०० कोटींचा पल्ला गाठला.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा चित्रपट तब्बल ५,००० स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासोबत तेलुगु आणि तमिळ भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. त्याचाच पुरेपुर फायदा झाला आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांचाही या चित्रपटाला फायदा झाला आहे.