मुंबई: बॉलिवडचा डान्सिंग हिरो, स्वतःचे स्टंट स्वतः करणारा अभिनेता टायगर श्रॉफचा आज ३१ वर्षाचा झाला आहे. अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा म्हणून ओळख निर्माण करण्याऐवजी टायगरने बॉलिवूडमध्ये आपली स्वत: चा दबदबा निर्माण केलाय. २०१४ साली हिरोपंती चित्रपटामधून पदार्पण करणाऱ्या टायगरने अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. पण त्याच नाव टायगर का? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. याचं उत्तर स्वतः जॅकी श्रॉफ यांनी दिलं आहे. टायगरचे खरे नाव जय हेमंत श्रॉफ असं असल्याचं जॅकी यांनी म्हटलं होतं.“जय लहान होता तेव्हा तो सर्वांचा चावा घ्यायचा. त्यामुळेच मी त्याला लाडाने माझा टायगर असं म्हणायचो. त्यातूनच पुढे त्याला मी टायगर म्हणून लागलो आणि तेच नाव त्याची ओळख बनलं,” असे जॅकी श्रॉफ म्हणाले.