नवी दिल्ली- तीन तलाक ही पद्धत कायदा विरोधी असल्याने ‘मुस्लिम महिला (विवाह अधिकार संरक्षण) विधेयक २०१८’ आज लोकसभेत मांडण्यात आले. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. विविध मुद्द्यावर सभागृहात गदारोळ सुरु असतांना कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी तीन तलाक विरोधी विधेयक सभागृहात मांडण्याची परवानगी मागितली.
कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी या विधेयकाला विरोध करत महिलांवरील अत्याचार कमी करणे सोडून सरकार एका विशेष समुदायासाठी कायदा करत असल्याचे सांगितले. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे विधेयक मुस्लिम महिलांच्या अधिकाराचा रक्षण करणारा आहे. उच्च न्यायालयाने तीन तलाक असंवैधानिक ठरविले आहे. त्यामुळे मुस्लिम महिलांच्या हितासाठी हा विधेयक लोकसभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला असल्याचे सांगितले.