पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून भाजप मंडळाध्यक्षावर हल्ला

0

कोलकाता: आज लोकसभ निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. संपूर्ण देशात शेवटच्या टप्प्यात पश्चिम बंगाल विशेष चर्चेत राहिले. या ठिकाणी शेवटच्या टप्पात हिंसाचार पाहायला मिळाला. आज मतदानाच्या दिवशी देखील येथील हिंसाचार थांबलेला नाही. आज तृणमूलच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपच्या मंडळ अध्यक्षांच्या वाहनावर हल्ला करत तोडफोड केल्याची घटना घडली. तृणमूलच्या गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप भाजपकडून होत आहे. भाजपचे उमेदवार अनुपम हजारा यांनी याबाबत तृणमूलला दोषी ठरविले आहे. तृणमूलचे ५२ कार्यकर्ते बूथवर अडथला आणत असल्याचे आरोप त्यांनी केले आहे.