कोलकाता: आज लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. शेवटचा टप्प्यातील देशभरात पश्चिम बंगालची अधिक चर्चा झाली. याठिकाणी हिंसाचार पाहायला मिळाला. दरम्यान आज सकाळपासून मतदान होत असून, तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते लोकांना मतदान करू देत नसल्याचे आरोप भाजपचे उमेदवार सयांतन बसू यांनी केले आहे. तृणमूलचे १०० कार्यकर्ते बशीरहाट येथील मतदान केंद्राबाहेर तैनात असून ते लोकांना मतदान करण्यास मज्जाव करत असल्याचे आरोप भाजप उमेदवाराने केले आहे. तृणमूल कॉंग्रेसच्या निषेधार्थ मतदारांनी निषेध नोंदविल्याचे पाहायला मिळाले.