मुंबई :- मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामातील सुरुवात चांगली झाली नाही. मुंबईने एकूण १० सामन्यांपैकी ६ सामने गमावले असल्यामुळे त्यांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक आहे. आज ईडन गार्डन्सवर मुंबई आणि कोलकाता यांच्यादरम्यानचा दुसरा सामना होणार आहे. रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईने कोलकात्याला १३ धावांनी मात दिली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात पराभवाचा वचपा काढण्याची कोलकात्याकडे चांगली संधी आहे.
२०१४ सालच्या आयपीएल हंगामात मुंबईने शेवटच्या ६ पैकी ५ सामने जिंकून बाद फेरीत प्रवेश मिळवला होता. आणि यंदाच्या हंगामातही त्यांची गेल्या २ सामन्यांमधील कामगिरी पाहता ते त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीच्या वाटेवर असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.