बाबरी मस्जिद पडण्याच्या घटनेला आज २६ वर्ष पूर्ण !

0

नवी दिल्ली – अयोध्येमध्ये ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मस्जिद पाडण्यात आली होती. या घटनेला आज २६ वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर अयोध्येत कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

देशात सध्या राम मंदिर निर्माणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारतीय जनता पार्टीकडून आज अयोध्येतील कारसेवक भवनात शौर्य दिवस साजरा करण्यात येत आहे. नवी दिल्लीसहीत देशातील काही भागांमध्ये विश्व हिंदू परिषद, शिवसेनेकडूनही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे, मुस्लिम पार्टीतील लोक याप्रकरणातील पक्षकार इकबाल अंसारी यांच्या घरी काळा दिवस पाळणार आहेत.