म्हणून बिग-बी वाढदिवस साजरा करणार नाही

0

मुंबई- महानायक बिग-बी अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देत आहेत. अमिताभ यांनी देखील ट्विटरवरून आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विट करून लिहिले आहे की, माझ्या वाढदिवसाला तुम्ही सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मी आभार मानतो.

अमिताभ बच्चन यांचा हा ७६ वा वाढदिवस असून हा वाढदिवस ते कुठे साजरा करणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. पण ते आज वाढदिवस साजरा करणार नाहीत असे सांगितले आहे. अमिताभ यांची मुलगी श्वेता नंदाच्या सासऱ्यांचे काही महिन्यापूर्वी निधन झाले तर श्वेताच्या सासूची आई म्हणजेच कृष्णा राज कपूर यांचे काहीच दिवसापूर्वी निधन झाले. या दोघांसोबतही बच्चन कुटुंबियांचे संबंध चांगले होते त्यामुळेच अमिताभ यांनी हा वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले असल्याचे म्हटले जात आहे.