नवी दिल्ली-तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. कोणत्या विषयावर ते भेट घेऊन चर्चा करणार हे मात्र अद्याप निश्चित नाही. तेलंगणा राज्य सरकारला विकासासाठी निधी देण्याबाबत मागणी करू शकता.
लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. भाजप विरोधात अनेक विरोधी पक्ष एकत्र येत महाआघाडी करत आहे. तर भाजप व महाघाडीला पर्याय म्हणून चंद्रशेखर राव तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न करीत आहे. त्यांनी याबाबत काही नेत्यांची भेट देखील घेतली आहे. ममता बॅनर्जी, नवीन पटनायक यांची त्यांनी भेट घेतली आहे.