आज संरक्षणमंत्री राफेल प्रोजेक्टला देणार भेट; राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न

0

पेरिस-राफेल करारावरून भारतात राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहे. दरम्यान संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण फ्रांसच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज त्या ज्या ठिकाणी राफेल विमान तयार करण्याचे काम सुरु आहे त्याठिकाणी भेट देणार आहे. कामकाजाबाबत त्या आढावा घेणार आहे.

राफेल करारासाठी अंबानी यांना पार्टनर म्हणून निवडण्याचा निर्णय दसॉल्ट एविएशन यांनी घेतल्याचे देखील निर्मला सीतारमण यांनी सांगितले.

राहुल गांधी यांनी संरक्षणमंत्र्यांच्या या फ्रांस दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले आहे. राफेलच्या अपयशाला लपविण्याचे प्रयत्न सुरु असून करार वैध ठरविण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे आरोप केले आहे.