नवी दिल्ली- आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीतील उपांत्य फेरीतील सामन्यात भारतीय संघाने जपानवर ३-२ ने मात केली आहे. या विजयासह भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत भारताचा सामना प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. विजयाची परंपरा अखंडपणे ठेवत उपांत्य सामन्यात भारताने आशियायी खेळ सुवर्णपदक विजेत्या जपानवर वर्चस्व गाजवले.
भुवनेश्वर येथे होणाऱ्या विश्वचषक हॉकी स्पर्धेआधीची ही अखेरची स्पर्धा असल्यामुळे टीकाकारांना चोख उत्तर देण्यासाठी तसेच आत्मविश्वास उंचावण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. भारताच्या कामगिरीवर नजर टाकली तर गतविजेत्यांनी आतापर्यंत पूर्णपणे हुकमत गाजवली आहे.