प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल आज मांडणार अर्थसंकल्प !

0

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या काळातील शेवटचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री पीयूष गोयल मांडणार आहेत. या अंतरिम अर्थसंकल्पात अनेक महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री म्हणून पदभार असलेले पीयूष गोयल संसदेत पोहोचले आहे. आज ते अर्थसंकल्प मांडतील. लोकसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकार काही सवलती देऊ शकते, असे मानले जात आहे. यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात वैयक्तिक करदात्यांना काही कर सवलती मिळण्याच्या शक्यता आहेत. मात्र अंतरिम अर्थसंकल्पात सरकार अशा सवलती त्याद्वारे देणार का, याबाबत उलटसुलट चर्चा सुरूच आहे. तसे घडल्यास, वैयक्तिक बचत, निवृत्ती लाभ, वित्तीय नियोजन आणि क्रयशक्ती यावर त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.