मृणालिनी साराभाई यांना गुगलची सलामी

0

नवी दिल्ली-भारतातील नावाजलेल्या नृतकलाकार पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित मृणालिनी विक्रम साराभाई यांचा आज १०० वा जन्मदिवस आहे. या महान कलाकाराला गुगलने डूडलच्या रुपात प्रसिद्ध करून श्रद्धांजली अर्पण केली आहे. हे गुगल डूडल सुदिप्ती टकर यांनी तयार केले आहे. मृणालिनी साराभाई ह्यांनी १९४९ मध्ये पॅरीस येथे नृत्याविष्कार सदर केला त्यानंतर त्यांना जगभर प्रसिद्धी मिळाली. क्लासिकल नृत्याला यशाच्या उंच शिखरावर नेण्याचे काम साराभाई ह्यांनी केले. या गुगल डूडल मध्ये साराभाई छत्री घेऊन उभ्या आहेत आणि त्यांच्या मागे काही कलाकार नृत्य सदर करत असतांना दिसत आहे.