लालूच्या जामिनासाठी आज सुनावणी !

0

पाटना-आयआरसीटीसी घोटाळ्यातील आरोपी असलेले आरजेडी नेता लालू प्रसाद यादव यांच्या जामिनासाठी आज कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यासाठी मुलगा तेजस्वी यादव आणि पत्नी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी आज पटियाला हाउस कोर्टात हजर होण्यासाठी रवाना झाले आहे. लालू प्रसाद यादव यांची व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे हजेरी लागणार आहे. कोर्टाने या अगोदर ६ ऑक्टोंबर रोजी राबडी देवी आणि तेजस्वी यादवला जामीन मंजूर केलेली आहे.

मागील सुनावणी वेळी लालू प्रसाद यादव व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे मत मांडू शकले नव्हते. त्यामुळे कोर्टाने सुनावणी टाळली होती. त्यानंतर कोर्टाने सीबीआयला व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे सुनावणीची व्यवस्था करावे असे आदेश दिले होते.