आज मल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत लंडनच्या न्यायालयात सुनावणी

0

लंडन – भारतीय बँकांना ९ हजार कोटी रुपयांचा चूना लावून परदेशात फरार असलेला उद्योगपती विजय मल्ल्याचेभारतात प्रत्यार्पण करण्याबाबत आज लंडनमधील न्यायालय निकाल देणार आहे. या निकालाच्या वेळी हजर राहण्यासाठी सीबीआयचे सहसंचालक ए. साई मनोहर यांच्या नेतृत्वाखालील सीबीआय व ईडीच्या अधिकाऱ्यांची एक संयुक्त पथक लंडनला पोहोचली आहे.

दरम्यान, आपल्याला सर्व कर्जाची परतफेड करायची इच्छा होती, मी फक्त मुद्दल फेडू शकतो असे माल्याने यापूर्वी सांगितलेले आहे.

भारत सरकारने केलेल्या प्रत्यार्पण अर्जावर वेस्टमिनस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टातील न्यायाधीश एम्मा ऑर्बथनॉट या आज निकाल जाहीर करतील. गेल्या वर्षी ७ डिसेंबरपासून ही सुनावणी सात दिवस व्हायची होती. प्रत्यक्षात ती त्याहून कितीतरी अधिक चालली. यात भारत सरकारची बाजू ब्रिटनच्या क्राऊन प्रॉसिक्युशन सर्व्हिसच्या वतीने मार्क समर्स यांच्या नेतृत्वाखालील प्रॉसिक्युटर्सनी मांडली. माल्याचा बचाव क्लेअर मॉन्टगोमेरी या ज्येष्ठ वकिलाने केला.