आज वर्ल्डकपमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामना

0

लंडन: आज भारत ऑस्ट्रेलिया मध्ये क्रिकेट सामना होणार असून ऑस्ट्रेलियाला कमी धाव संख्येत रोखण्याचे आव्हान भारतापुढे आहे. भारता विरुद्ध लढतांना ऑस्ट्रेलियाचे पारडे नेहमी जड राहिले आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा होता. त्या ठिकाणी झालेल्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला नमवले होते. वर्ल्डकप सुरु व्हायच्या आधी ऑस्ट्रेलियन टीम भारत दौऱ्यावर आली असता भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. हा सामना ओव्हल येथे दुपारी ३ वाजता खेळवला जाणार आहे.

भारतीय संघात आज बदल झाल्यास एकच होईल तो म्हणजे म्हणजे फिरकी गोलंदाज कुलदीप यादव किवा  चहलला विश्रांती देऊन वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला अंतिम अकरात स्थान मिळू शकते. आज  भारतीय संघ बुमराह, भुवी, शमी अशा तीन प्रमुख गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. किंवा भुवीला विश्रांती देऊन शमीला संघात स्थान मिळू शकते.

शिखर धवन आयसीसीच्या स्पर्धेत नेहमीच प्रभावी ठरला आहे. मात्र यावेळी शिखर धवन आपली कामगिरी दाखवू शकला नाही. सलामीच्या सामन्यात केवळ ८ धावा करत तंबूत परतला होता. या सामन्यात धवनला विश्रांती दिल्यास लोकेश राहुल सलामीला येऊ शकतो. आणि विजय शंकर, रवींद्र जडेजापैकी एकाला संघात स्थान मिळू शकेल. आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्डकपमध्ये ११ सामने झाले असून त्यात ८ वेळा ऑस्ट्रेलिया संघ विजयी झाला आहे, तर भारत ३ वेळा विजयी झाला आहे. आजच्या या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.