आज पासून एसटी भाडेवाढ लागू

0

मुंबई : एसटीच्या भाडेवाढीला प्राधिकरणाणे मान्यता दिली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात आजपासून १८ टक्के वाढ झाली आहे. अचानक झालेल्या भाडेवाढीमुळे प्रेक्षकांमध्ये असंतोष आहे. डिझेलचे वाढते दर तसेच एसटी कामगारांची नुकतीच करण्यात आलेली वेतनवाढ यामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नाइलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात येत आहे.

सुट्टे पैशांचा प्रश्न मिटणार
याचबरोबर यापुढे तिकीटाची भाडे आकारणी ही ५ रुपयांच्या पटीने करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. म्हणजे एखाद्या प्रवासाचे तिकीट ७ रुपये असेल तर त्याऐवजी ५ रुपये आकारले जातील. तसेच ८ रुपये तिकीट असल्यास १० रुपये तिकीटदर आकारला जाईल. सुट्ट्या पैशांसाठी प्रवासी आणि वाहकांदरम्यान नेहमी वादावादी होते. या निर्णयामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटणार असून ही वादावादी थांबेल, असं एसटी महामंडळाने सांगितले आहे.