मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला चौथा वन-डे सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी 1-1 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजचा सामना मालिकेत आघाडी मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघात आज ‘काटे की टक्कर’ होणार आहे. भारत आणि विंडीज यांच्यातील दुसरा सामना बरोबरीत सुटला होता. ब्रेबॉर्नवर भारतापेक्षा ( एक सामना) अधिक सामना विंडीजने ( 4 सामने ) खेळले आहेत. त्यामुळे येथील खेळपट्टीचा त्यांना चांगला अनुभव आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आहे.
या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला शतक झळकावून श्रीलंकेच्या महान फलंदाज कुमार संगकाराच्या दोन विक्रमांशी बरोबरी करण्याची संधी आहे. सलग चार वन डे सामन्यांत शतकांची आणि एकूण 63 शतकं झळकावण्याच्या विक्रमाशी विराट बरोबरी करू शकतो.