आयफोनच्या चाहत्यांसाठी खुशखबर; आयफोन 11 चे आज लाँचिंग !

0

कॅलिफोर्निया: मोबाईलचा राजा म्हणून आयफोनला ओळखले जाते. आज आयफोनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज मंगळवारी १० रोजी iPhone 11 लाँच होणार आहे. कॅलिफोर्नियातील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. भारतीय वेळेनुसार, आज रात्री १०.३० वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. आयफोन ११ सोबत iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max हे फोनदेखील लाँच केले जाण्याची शक्यता आहे. अॅपलची आयफोनव्यतिरिक्त अन्य अनेक उत्पादने लाँच होऊ शकतात.

अॅपल वॉच सीरिज ५, एअरपॉड्स, १६ इंचाच मॅकबुक प्रो, आयपॅड्स आदि उत्पादने आज लाँच होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अॅपल नेहमी नव्या आयफोनसोबत अद्ययावत सॉफ्टवेअरदेखील उपलब्ध करतं. यामुळे कदाचित आज आयओएस १३ देखील लाँच केली जाऊ शकते.