‘मन की बात’मधून मोदींनी पाकिस्तानला खडसावले

0

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसात सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना आणि पाकिस्तानी रेंजर्सशी लढताना भारताचे अनेक जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानी सैन्यावर आपण स्वतःहून कधीही हल्ला केला नाही. कारण आपण शांततेवर विश्वास ठेवतो, मात्र असे असले तरी देशाच्या सन्मानाशी आणि जवानांच्या बलिदानाशी कधीही तडजोड करणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला खडसावले आहे. मन की बात या आपल्या रेडिओवरील कार्यक्रमात ते बोलत आहेत.