मोदींच्या हस्ते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे उदघाटन

0

नवी दिल्ली – इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा आज तालकटोरा स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे. या बँकेच्या देशभरामध्ये ६५० शाखा आणि ३२५० एक्सेस पॉईन्ट असणार आहेत. देशातील १ लाख ५५ हजार पोस्ट ऑफिस ३१ डिसेंबरपर्यंत या बँकेशी जोडली जाणार आहेत.

आयपीपीबीला सामान्य नागरिकांना साधे, किफायती आणि विश्वसनीय बँकेच्या रुपात स्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारण केंद्र सरकारच्या आर्थिक उद्देश तत्काळ पूर्ण होण्यासाठी याची मदत होणार आहे.

आयपीपीबीच्या माध्यमातून बचत आणि चालू खाते, धनादेश व प्रत्यक्षातील व्यवहार, बिल यासारख्या सुविधा देण्यात येणार आहेत. या सेवासोबत काउंटर सेवा, मायक्रो एटीएम, मोबाईल बँकींग अॅप, एसएमएस आणि आयवीआरची ही सेवा यामध्ये दिली जाईल.