‘मन की बात’: सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश एकतेसाठी धावेल-मोदी

0

नवी दिल्ली- गुजरातमध्ये लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. येत्या ३१ ऑक्टोबर रोजी सरदार पटेल यांची जयंतीनिमित्त संपूर्ण देश एकतेसाठी धावणार आहे. हीच खरी श्रद्धांजली ठरणार आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’द्वारे सांगितले. आज मोदींनी ४९ व्या ‘मन की बात’द्वारे नागरिकांशी संवाद साधले.

पंतप्रधान मोदी आज जपान दौऱ्यावर आहेत.

विश्वशांतीसाठी भारताचे सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल
जेंव्हा जेंव्हा विश्वशांतीची गोष्ट केली जाईल तेंव्हा तेंव्हा भारताचे नाव आणि योगदान या विषयी सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल असे मोदी यांनी यावेळी सांगितले.

सदैव सैनिकांसोबत
मोदींनी २०१८ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल मोदींनी खेळाडूंचे कौतुक केले. तसेच भारतीय हॉकी टीमला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी मोदींनी शुभेच्छाही दिल्या. याशिवाय 11 नोव्हेंबर रोजी पहिल्या महायुद्धाला 100 वर्ष पूर्ण होत असल्याचे सांगत मोदींनी भारतीय सैनिकांच्या शौर्याचा उल्लेख केला. त्या महायुद्धातील आपल्या कर्तुत्वाने आमच्या सैनिकांनी युद्ध करण्याची वेळ आली तर आम्ही कुठेही कमी पडू शकत नाहीत हे जगाला दाखवून दिले असे मोदी म्हणाले.