नवी दिल्ली: १९८४ मधील शीख विरोधी दंगलीप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी कॉंग्रेस नेते सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यांच्यावर शीख विरोधी दंगल भडकविण्याचे आरोप आहे. दरम्यान आज त्यांना पुन्हा सुनावणीसाठी कोर्टात हजर केले जाणार आहे. जिल्हा न्यायाधीश पूनम ए.बाम्बा यांनी या प्रकरणात साक्षीदारांचे निवेदन नोंदविण्याचे ठरवले आहे. त्यासाठी सज्जन कुमार यांना कोर्टात हजर राहावे लागणार आहे.
यापूर्वी साक्षीदार मुख्य साक्षीदार चम कौर यांनी १६ नोव्हेंबर रोजी न्यायालयात सज्जन कुमार हे दंगल भडकविण्याला जबाबदार असल्याचे सांगितले आहे. शिखांनी आपल्या आईला मारले आहे, त्यांना मारा असे आदेश सज्जन कुमार देत होता असे कौर यांनी सांगितले होते. सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा होण्यासाठी कौर यांचा साक्ष महत्त्वाचे ठरले.