नवी दिल्ली-काल कोलकातामध्ये सीबीआयने कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकला त्यानंतर पोलिसांनी सीबीआयच्या पथकाला अटक केली. यावरून मोठा वाद पेटला आहे. दरम्यान आज तृणमूल कॉंग्रेस पक्षासह इतर २२ विरोधी पक्ष निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.
ममता बॅनेर्जी यांनी कोलकातामध्ये केंद्र सरकार विरोधात धरणे आंदोलन सुरु केले आहे. कालपासून त्या धरणे आंदोलनाला बसल्या आहे. त्यांना देशभरातील विरोधकांनी पाठिंबा दिला आहे.