लखनौ- काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची धुरा स्वीकारल्यानंतर प्रियंका गांधी या आजपासून पहिल्यांदाच उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. प्रियंका गांधी यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेश झाल्यानंतर देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच लोकसभा आणि विधानभेतील जागांच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी यांच्या आगमनामुळे पक्षाला गतवैभव मिळेल, अशी काँग्रेसला अपेक्षा आहे. त्यामुळे आज प्रियंका गांधी यांच्या लखनौ येथे होणाऱ्या रोड शोकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.