आज प्रियांका-निकचा हिंदू पद्धतीने विवाह !

0

जयपूर-अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास आज लग्नानंतर खऱ्या अर्थाने पती-पत्नी झाले आहे. काल त्यांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. आज त्यांचा हिंदू पद्धतीने विवाह होत आहेत. लग्नाच्या धामधुमीत प्रियांकाला आपल्या बरेलीतील मूळ घराचा विसर पडला. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत प्रियांकाच्या बरेलीतील घरात कुठलाही झगमगटात नव्हता. अखेर प्रशासनाच्या मदतीने बरेलीतील नागरिकांनी प्रियांकाच्या घरावर रोषणाई केली.

प्रियांकाच्या लग्नामुळे अख्ख्या बरेलीत उत्साह संचारला आहे. लग्नानंतर प्रियांकाने एकदा तरी बरेलीला यावे, अशी अनेकांची इच्छा आहे. बरेली हे प्रियांका चोप्राचे स्व.वडिल अशोक चोप्रा आणि मधू चोप्रा यांची कर्मभूमी राहिली आहे.

आज २ डिसेंबरला प्रियांका व निक हिंदू पद्धतीने विवाहबद्ध होत आहेत. जोधपूरच्या उमेद भवन या रॉयल पॅलेसमध्ये हे शाही लग्न होणार आहे. हिंदू पद्धतीच्या विवाहात निक अगदी राजसी थाटात बग्घीवरून एन्ट्री घेणार आहे. हिंदू पद्धतीनुसार होणा-या लग्नात प्रियांका चोप्रा अबू जानी आणि संदीप खोसला किंवा सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाईन केलेल्या लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसणार आहे.

अमेरिकन पॉप सिंगर निक जोनास व प्रियांका अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. याचवर्षी प्रियांकाच्या वाढदिवसाला निक भारतात आला होता आणि याचठिकाणी त्याने पीसीला लग्नासाठी प्रपोज केली. यानंतर भारतातचं प्रियांका व निकचा ‘रोका’ झाला होता. लग्नानंतर प्रियांका-निक दोन रिसेप्शन देतील. यापैकी एक दिल्लीत होईल तर दुसरे मुंबईत.