आज राहुल गांधींची महाराष्ट्रात पहिली सभा !

0

मुंबईः विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आजचा शेवटचा रविवार आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रात अनेक दिग्गज नेते सभा घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचारसभांनी आजचा दिवस गाजणार आहे. दरम्यान राज्यात विधानसभा निवडणूक सुरु झाल्यानंतर देखील राहुल गांधी फारसे सक्रीय झाले नव्हते, आज अखेर त्यांची पहिली सभा महाराष्ट्रात होत आहे. लातूर जिल्ह्यातील औसा येथे आज त्यांची पहिली सभा आहे. मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक म्हणून काम पाहिलेले अभिमन्यू पवार यांच्या मतदार संघात राहुल गांधी सभा घेत आहे.

दरम्यान आज जळगाव जिल्ह्यात देखील हाय व्होल्टेज सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, असुउद्दिन ओवेसी यांची सभा होणार आहे.