जयपूर- आज राजस्थानमध्ये कॉंग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळ निवड होणार आहे. सकाळी ११.३० वाजता राजभवनात नवनियुक्त मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. २३ आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. यात १७ म्हणजेच २/३ पेक्षा अधिक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. १३ कॅबिनेट व १० राज्यमंत्री शपथ घेणार आये. सरकार स्थापनेसाठी इतर पक्षांची मदत घ्याची लागल्याने राष्ट्रीय लोक दलकडून विजय झालेले भरतपुरचे आमदार सुभाष गर्ग यांना मंत्रीपद देण्यात आले आहे.
विशेषबाब म्हणजे या मंत्रिमंडळात ६० टक्के मंत्री मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे तर ४० टक्के मंत्री सचिन पायलट यांचे समर्थक आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री अशोक गेहलोत सचिन पायलट पेक्षा वरचढ ठरले आहे.
१३ कॅबिनेट मंत्री
बीडी कल्ला, शांति धारीवाल, परसादी लाल मीणा, मास्टर भंवरलाल मेघवाल, लालचंद कटारिया, डॉ रघु शर्मा, प्रमोद जैन भाया, विश्वेंद्र सिंह, हरीश चौधरी, रमेश चंद्र मीणा, उदयलाल आंजना, प्रताप सिंह खाचरियावास, सालेह मोहम्मद.
१० राज्य मंत्री
गोविंद सिंह डोटासरा, ममता भूपेश, अर्जुन बामनिया, भंवरसिंह भाटी, सुखराम विश्नोई, अशोक चांदणा, टीकाराम जूली, भजनलाल जाटव, राजेंद्र यादव, सुभाष गर्ग.