आज होणार सीबीआय डायरेक्टर निवडीवर शिक्कामोर्तब !

0

नवी दिल्ली-देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयमधील वाद हा ज्वलंत मुद्दा आहे. दरम्यान आज सीबीआयच्या डायरेक्टर निवडीसाठी समितीची बैठक होणार आहे. त्यात डायरेक्टर निवडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. १० अधिकाऱ्यांच्या नावाची लिस्ट निवड समितीसमोर ठेवण्यात आली आहे. यात काही महिला अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. एखाद्या महिलेची निवड झाल्यास ही पहिलीच घटना असणार आहे.