मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्ट्या आज सहा तास बंद !

0

मुंबई-देशातील सर्वात मोठ्या आणि व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबईच्या छत्रपति शिवाजी विमानतळावरील मुख्य तसेच द्वितिय धावपट्ट्या आज दुरुस्तीच्या कामांसाठी सहा तासांसाठी बंद राहणार आहेत. सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दोन्ही धावपट्ट्या बंद ठेवण्यात येणार आहेत.

रद्द झालेली विमाने, किंवा वेळेत बदल केलेल्या विमानांबाबत प्रवाशांनी एअर इंडियाच्या संकेतस्थळावर, अॅपवर किंवा कॉल सेंटरला विचारणा करावी अशी माहिती एअर इंडियाने ट्विटरद्वारे दिली आहे. विमानतळावरील मुख्य धावपट्टी आणि द्वितिय धावपट्टीवर आज दुरूस्तीचं काम करण्यात येणार आहे. दोन टप्प्यांमध्ये विमानतळावरील धावपट्टीचे काम केले जाणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्याचे काम ऑक्टोबरमध्ये होत असून त्यानंतर ७ फेब्रुवारी ते ३० मार्चच्या दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील कामं केली जातील. यामध्ये 21 मार्च वगळता मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवारी सकाळी ११ ते ५ या दरम्यान धावपट्टा बंद असणार आहेत. यामुळे दररोज उड्डाण घेणाऱ्या जवळपास ३०० विमानांवर याचा परिणाम होणार आहे.