आजपासून विश्वचषकाचा थरार !

0

लंडन: आजपासून क्रिकेटच्या महासंग्रामाला अर्थात आयसीसी वर्ल्ड कप 2019 ला सुरुवात होत आहे. आज इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांचा पहिला सामना होणार आहे. दुपारी 3 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ वर्ल्ड कपमधील पहिला सामना 5 जूनला आफ्रिकेविरुद्धच खेळणार आहे. ५ जूनला भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिका संघाविरोधात होणार आहे. त्यानंतर ६ जूनला ऑस्ट्रेलिया विरोधात भारतीय संघ खेळणार आहे.

मुख्य स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाने दोन सराव सामने खेळले. पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. पण, दुसऱ्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशवर 95 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात लोकेश राहुल व महेंद्रसिंग धोनी यांनी शतकी खेळी साकारली.