आज जिओ फोन-२ चा तिसरा फ्लॅशसेल !

0

नवी दिल्ली-आतापर्यंत झालेल्या दोन सेलमध्ये ज्या ग्राहकांना जिओ फोन-२ खरेदी कता आला नाही अशा ग्राहकांसाठी आज पुन्हा एकदा संधी आहे. जिओ फोन-2 चा तिसरा सेल आज आहे. आज दुपारी 12 वाजेपासून फ्लॅशसेल सुरू होत असून ग्राहकांना हा फोन www.jio.com या वेबसाईटवर आणि myjio app वरुन खरेदी करता येईल.

हा फ्लॅशसेल असल्यामुळे मर्यादीत फोनचीच विक्री होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पहिल्यांदा नोंदणी करणाऱ्याला फोनसाठी प्राधान्य दिले जाईल. फ्लॅशसेलमध्ये खरेदी केल्यानंतर 5 ते 7 दिवसांमध्ये हा फोन ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. तसेच अधिकृत रिटेलरकडूनही फोन खरेदी करता येणार आहे.

यू ट्यूब, व्हॉट्स अॅप आणि फेसबुकचे ‘इनबिल्ट’ अॅप, हॉरिझेंटल डिस्प्ले ही या नव्या फोनची वैशिष्ट्ये आहेत. दिसायला हा फोन जुन्या ब्लॅकबेरी फोनप्रमाणे असून 2 हजार 999 रुपये इतकी या फोनची किंमत ठेवली आहे. फोनमध्ये 512 एमबी रॅम आणि 4 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे, मेमरी कार्डद्वारे स्टोरेज 128 जीबीपर्यंत वाढवता येईल.

या 4जी फोनमध्ये 2000 एमएएच बॅटरी असून त्यामुळे 14 तासांचा टॉकटाइम बॅकअप मिळेल असा कंपनीचा दावा आहे. यामध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, एनएफसी आणि एफएम रेडिओ यांसारखे कनेक्टिविटी फिचर्स देण्यात आले आहेत. जिओ फोन मान्सून हंगामा ऑफरअंतर्गत जिओ युजर्स अवघ्या 501 रुपयांमध्ये त्यांचा जुना फोन बदलू शकणार आहे.