आज ‘तिहेरी तलाक’ राज्यसभेत; सरकारपुढे बहुमताचे आव्हान

0

नवी दिल्ली – केंद्र सरकारकडून आज राज्यसभेमध्ये मुस्लिम महिलांच्या अधिकाराच्या रक्षणासाठी आणलेला ‘तिहेरी तलाक’ विधेयक मांडण्यात येणार आहे. या विधेयकाला गुरुवारी लोकसभेत मंजुरी मिळाली असली तरी राज्यसभेत हे विधेयक मंजूर करुन घेणे सरकारसमोर आव्हानात्मक आहे. कारण राज्यसभेमध्ये सत्ताधारी पक्षाकडे बहुमत नाही. हे विधेयक निवड समितीकडे पाठवण्यात यावे, अशी मागणी काँग्रेससहीत अन्य विरोधी पक्षांनी लावून धरली आहे. याबाबत राज्यसभा अध्यक्षांना पत्रदेखील लिहिण्यात आले आहे. दरम्यान, दुपारी २ वाजण्याच्या सुमारास राज्यसभेत हे विधेयक सादर करण्यात येईल.