मोदी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर; ट्विटवर #BechendraModi ट्रेण्ड !

0

मुंबई: महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सभांचा धडाका सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: निवडणुकीवर लक्ष ठेवून आहे. परंतु नेटकऱ्यांकडून पंतप्रधान मोदींना विरोध होत आहे. #मोदीपरतजा हा हॅशटॅग रविवारी ट्विटवर टॉप ट्रेण्डींग होता. त्यानंतर आता मोदींच्या भूमिकेवर आक्षेप घेत #BechendraModi हा हॅशटॅग सुरू केला आहे.

https://twitter.com/SirAiyar/status/1184560445157298176

बुधवारपासूनच ट्विटर इंडियावर #BechendraModi हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. अनेक नेटकऱ्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या परिस्थितीवर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. देशातील सर्वात मोठी, सार्वजनिक तेल व वायू विक्री व विपणन कंपनी असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात बीपीसीएलचे खासगीकरण करण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मध्यंतरी समोर आली होती. या कंपनीतील निम्म्याहून अधिक, ५३ टक्के हिस्सा विक्रीची तयारी केंद्र सरकार करत असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात उत्सुक खरेदीदारांसाठी निविदा काढण्यात येणार आहे. देशातील खासगी इंधन व्यवसाय क्षेत्रात वरचष्मा असलेली मुकेश अंबानी यांचा प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रीज समूह या प्रक्रियेत रस घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच एमटीएनएल, बीएसएनएल सारख्या कंपन्यांच्या परिस्थितीवरूनही सर्वांनी निशाणा साधला आहे.