कर्नाटकातील सत्तासंघर्षाचा आज शेवटचा डाव

0

बंगळुरू: कर्नाटक सत्तासंघर्षाचा आज शेवटचा दिवस आहे, कर्नाटक मधील आपले सरकार वाचवण्यासाठी कॉंग्रेस, जेडीएस ने प्रयत्न सुरु ठेवले आहे. बंडखोर आमदारांनी आम्हाला या ठिकाणी कुणी आणले नसल्याचे सांगितले आहे. कॉंग्रेस, जेडीएसने बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री बदलवण्याचा प्रस्ताव दिला होता.

आमदारांनी या प्रकरणाला मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना जबाबदार धरत राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे कॉंग्रेस आणि जेडीएस ने मुख्यमंत्री बदलवण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर आमदारांनी आता पुन्हा सत्तेत पुन्हा परतण्याची शक्यता नसल्याचे सांगितले आहे.

जेडीएसने सरकार वाचविण्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करण्याची तयारी दाखवली आहे. तसेच जेडीएसने सिद्धरामय्या, जी परमेश्वर यांच्यासह कोणत्याही नेत्याला मुख्यमंत्री बनविण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. डी के शिवकुमार यांनी सांगितले होते की, जेडीएसने सरकार वाचविण्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करण्याची तयारी दाखवली आहे. तसेच जेडीएसने सिद्धरामय्या, जी परमेश्वर यांच्यासह कोणत्याही नेत्याला मुख्यमंत्री बनविण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे.