नीती आयोगाची आज बैठक, ममतांनी फिरवली पाठ

0

नवी दिल्ली: मोदी सरकार पार्ट 2 ची नीती आयोगाची आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकिला अनेक राज्यातील मुख्यमंत्री, राज्यपाल यांची उपस्थिती राहणार आहे. मात्र या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नसून त्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. त्यांनी तसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे.

ममता बॅनर्जी यांनी आपल्या पत्रात लिहले आहे की, नीती आयोगाकडे कोणतीहि आर्थिक ताकद नसून, राज्यांनी तयार आपल्या योजनाचे समर्थन करण्याची क्षमता नाही. त्या मुळे या बैठकीला हजेरी लावणे व्यर्थ असून मी या बैठकीला येणार नाही. तसेच आंध्रप्रदेश ला विशेष राज्याचा दर्जा मिळावा या साठी आंध्राचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डीया बैठकीत मागणी करणार आहे. हा दर्जा मिळवण्यासाठी जगनमोहन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट देखील घेतली होती.

आजच्या बैठकीत कॉंग्रेस शासित राज्याचे मुख्यमंत्री आपल्या विविध मागण्यासाठी सरकार्ला घेरण्याच्या तयारीत आहे. हि बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. नीति आयोगाच्या बैठकीचा अजेंडा ठरला असून, यामध्ये जल संधारण, कृषी आणि सुरक्षेतेच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. नीती आयोगाची बैठक राष्ट्रपती भवनात होणार असून या बैठकीला वित्त, गृह, संरक्षण, कृषी, वाणिज्य आणि ग्रामीण विकास मंत्रालयाचे मंत्री उपस्थित राहणार आहे.