आजचा विजय सपूर्ण भारताचा :नितीन गडकरी

0

मुंबई: आज सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजप ने जोरदार मुसंडी मारत विजयाच्या समीप पोहचले आहे. दरम्यान यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. गडकरी यांनी आपल्या ट्वीट मध्ये, आजचा विजय हा संपूर्ण भारताचा विजय असल्याचे म्हटले आहे.

आजचा विजय नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाचे यश असल्याचे म्हटले आहे. भाजपाने इतिहास रचला असून कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.

आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी ट्वीट केले आहे. निकालामध्ये भाजपला बहुमत मिळत असुन मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येत आहे हे स्पष्ट झाले आहे. आज संध्याकाळी भाजपाच्या मंत्र्यांची बैठक दिल्लीत घेण्यात आली आहे. या बैठकीला भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित राहणार आहे.