फैजपूर प्रतिनिधी ।
येथील गेल्या दोन वर्षापासून आठवडे बाजारातील शौचालयाचे बांधकाम लाखो रुपये खर्च करून पूर्ण झाले तरीसुद्धा शौचालय नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. फैजपूर नगरपरिषद अंतर्गत गेल्या दोन वर्षांपूर्वीपासून आठवडे बाजारातील शौचालय बांधण्यात आले. परंतु लाखो रुपये खर्च करून केवळ नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे या शौचालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
आहे. फैजपुरातील आठवडे बाजार यावल- रावेर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाजार भरतो. शेतकरी व व्यापारी यांना या शौचालयाचा उपयोग व्हावा म्हणून शासनाने नगर परिषद अंतर्गत शौचालय बांधण्यात आले. परंतु दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी सुद्धा या शौचालयाचा उपयोग होत नसल्यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून शौचालय सुरू होत नसल्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पालिकेने याबाबत जातीने लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आठवडे बाजारात येणाऱ्या शेतकरी व व्यापाऱ्यांनी केली आहे.