सहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथा

0

मुंबई- भारतात सहिष्णुता असहीष्णूतेबाबत नेहमीच बोलले जाते. दरम्यान ‘बीबीसी’साठी सर्व्हे करणाऱ्या ‘इप्सॉस मूरी’ या संस्थेने हा अहवाल दिला आहे त्यात सहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. सहिष्णूतेच्या बाबतीत कॅनडा, चीन आणि मलेशियाच फक्त भारताच्या पुढे आहेत. चिमुरड्यांवरचे अत्याचार, अल्पसंख्याकांमधली वाढती नाराजी, पुरस्कार वापसी… हे सगळं पाहिल्यावर आपल्या देश कुठे नेऊन ठेवलाय असा प्रश्न विचारला जातो. पण 27 देशांच्या यादीत सहिष्णुतेच्या बाबतीत भारत चक्क चौथ्या स्थानावर आहे. धक्कादायक म्हणजे चीन दुसऱ्या स्थानावर आहे.

चीनमध्ये मुस्लिमांवर  अनेक निर्बंध आहेत. सन उत्सवावर देखील निर्बंध आहे. कामगार क्षेत्रात तर कोणतेही कायदे नसल्याची परिस्थिती आहे. फेसबुक, गुगल यासारख्या वेबसाईट्स तिथे ब्लॉक करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच चीनचा या यादीतला दुसरा क्रमांक धक्कादायक ठरतो. सर्व्हेनुसार 63 टक्के भारतीय नागरिक विविध संस्कृती, दृष्टीकोनाच्या बाबतीत प्रत्येकाचं वेगळं मत असल्याने ते भारताला सहिष्णू देश मानतात. राजकीय विचारातील मतभेद तणावाचं कारण बनत असल्याचं 49 टक्के जणांना वाटत असल्याचं सर्व्हेमध्ये नमूद करण्यात आलं आहे. 48 टक्के लोक धर्मालाही जबाबदार धरतात तर 37 टक्के लोकांना सामाजिक-आर्थिक दरी तणावाचं कारण वाटते.