व्याजदर वाढण्याचे शक्यता
मुंबई। मॉनिटरी पॉलिसीवरून रिझर्व बँक तीन दिवसीय बैठक घेणार आहे. उद्या सोमवार ४ जून रोजी ही बैठक होणार आहे. गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीत वाढती महागाई, इंधन दरात होणारी वाढ आदी मुद्यांवर चर्चा होणार आहे. तसेच या बैठकीत रिझर्व बँक व्याजदर वाढविण्याबाबत विचार करणार आहे. या बैठकीत व्याजदर वाढीची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ऑगस्ट २०१७ पासून व्याजदरात कोणतीही वाढ अथवा घट झालेली नाही. परंतु यावेळी वाढती महागाईचा विचार करता व्याजदर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ६ जून रोजी व्याजदर वाढीबाबत विचार केला जाणार आहे.