उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार

0

मुंबई: महाराष्ट्र राज्य  माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल अखेर उद्या ८ रोजी जाहीर होणार आहे. उद्या दुपारी १ वाजता हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून दहावीच्या निकालाबाबत अफवा पसरविली जात आहे. अखेर आज निकालाबाबत घोषणा करण्यात आली आहे.