नवी दिल्ली – आज ‘सोशल मीडिया डे’ आहे. राजकारणातील व्यक्तींचा सोशल मीडियावर वावर वाढला आहे. ‘ट्विटर’ हे त्यापैकी प्रभावी माध्यम ठरले आहे. राजकारण्यांनी केलेले ट्वीट बातमीचे विषय ठरतात. ज्याचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. ज्याचे सर्वाधिक फॉलोअर्स तो राजकारणी अधिक प्रभावशाली अशी समज आज रूढ झाली आहे. देशातील पहिल्या पाच राजकारण्यांची माहिती आपण घेणार आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
फॉलोअर्सच्या यादीत पंतप्रधान मोदी यांचा पहिला क्रमांक लागतो. मोदी यांचे ट्विटरवर सर्वाधिक म्हणजे ४ कोटी ३२ लाख फॉलोअर्स आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सर्वाधिक फॉलोअर्स असणारे मोदींनंतरचे दुसरे राजकारणी आहेत. सध्या केजरीवाल यांना १ कोटी ३९ लाख ट्विटरवरून फॉलो करतात.
केंद्रीय मंत्री अरूण जेटली
केंद्रीय मंत्री अरूण जेटली हे देखील ट्विटरवर सक्रिय असतात. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यानंतर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे जेटली तिसऱ्या क्रमांकाचे राजकारणी आहेत. जेटली यांना ट्विटरवरून फॉलो करणाऱ्यांची संख्या १ कोटी ३० लाखांच्या आसपास आहे.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या एकमेव महिला राजकारणी आहेत. अलीकडच्या काळात स्वराज यांची ट्विटरवरील सक्रियता वाढली आहे. स्वराज यांना ट्विटरवरून १ कोटी १८ लाख लोक फॉलो करतात.
गृहमंत्री राजनाथ सिंह
गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा फॉलोअर्सच्या यादीत ५ वा क्रमांक लागतो. राजनाथ सिंह यांचे ट्विटरवर १ कोटी १२ लाख फॉलोअर्स आहेत.