नवी दिल्ली: सध्या देशात आर्थिक मंदी आहे. त्याचा परिणाम उद्योग व व्यापारावर जाणवत आहे. अनेकांना आपली नोकरी गमवावी लागत आहे. दरम्यान जीएसटीत देखील घट झाल्याचे पाहायला मिळते. ऑगस्ट महिन्यात ९८ हजार २०२ कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) स्वरुपात जमा झाला आहे. यात केंद्राचा हिस्सा १७ हजार ७३३ कोटी, राज्याचा हिस्सा २४ हजार २३९ कोटी, इंटीग्रेटेड जीएसटी स्वरूपात ४८ हजार ९५८ कोटी रुपये जमा झाला आहे.