कोरोना चाचणीत भारतच ‘सबसे आगे’

0

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. देशात कोरोना बाधितांमध्ये दररोज होणारी वाढ ही धडकी भरविणारी आहे. भारतात दररोज ७० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहे. मागील २४ तासात तर देशात आतापर्यतची सर्वाधिक कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. मागील २४ तासात तब्बल ८३ हजार ८८३ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहे. तर १ हजार ०४३ जणांचा मृत्यू झाला आहे. चिंता वाढविणारी ही आकडेवारी आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या ३८ लाख ५३ हजार ४०७ वर पोहोचली आहे. त्यातील ८ लाख १५ हजार ५३८ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहे. २९ लाख ७० हजार ४९३ बधीतांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दुर्दैवाने देशात ६७ हजार ३७६ जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. देशातील बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. अॅक्टीव्ह रुग्ण संख्या २१ टक्क्यांवर आली आहे. १.७५ टक्के मृत्यू दर आहे.

कोरोना चाचणीचे प्रमाण वाढल्याने बाधितांची संख्याही वाढत आहे. कोरोना चाचणी करण्यात जगात भारत अव्वलस्थानी आहे. भारताने आत्तापर्यंत तब्बल साडेचार कोटी चाचण्या केल्या आहेत. मागील २४ तासात म्हणजे एका दिवसात देशात ११ लाख ७२ हजार १७९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ८३ हजार ८८३ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.