कराची : पाकिस्तानमध्ये ट्रेनला भीषण आग लागून ६५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पाकिस्तान मधील कराची, रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसला भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.