पुणे येथे पतीकडे जात होत्या ; भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरविला मृतदेह
जळगाव- उत्तरप्रदेशातून पुणे स्पेशल एक्स्प्रेसने पुणे येथे जात असलेल्या माया राजेश शुक्ला वय 48 रा. नवाबगंज, जि. इलाहाबाद, उत्तरप्रदेश या महिलेचा प्रवासात मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. महिलेला ताप आल्याने तिच्यावर उपचार सुरु होते, यानंतर प्रवासात तिला चक्कर आले अन् खाली पडली पुन्हा उठलीची नसल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
माया राजेश शुक्ला यांचे पती राजेश शुल्का हे पुणे येथे कामाला आहे. मुलगी गीतासह माया ही नवाबगंज येथे राहते. दोन ते तीन दिवसांपूर्वी तिला अचानक प्रचंड ताप आला. श्वासही घेण्यास अडचणी येत असल्याने तिच्यावर तेथील रुग्णालयात दाखल करुन उपचार घेण्यात आले. यानंतर माया हिने तिचे भाऊ गोविंद दुबे यांना पतीकडे पुणे येथे जावयाचे असल्याचे सांगितले. व त्याठिकाणी चांगल्या रुग्णालया उपचार घेवू असेही म्हणाली. त्यानुसार गोविंद, माया व गीता हे तिघे शनिवारी पुणे येथे जाण्यासाठी बिहार येथून गाडी क्रमांक. 01441 मंडवाली पुणे स्पेशल या एक्स्प्रेसमध्ये बसले.
एकुलत्या मुलीच्या डोळ्यादेखत मृत्यू
प्रवासात माया शुक्ला यांनी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास चहा पिला. चहा पिल्यावर त्यांना अचानक चक्कर आले व बसलेल्या सीटावर पडल्या . यावेळी माया यांची मुलगी गीता हिला प्रकार लक्षात आला. तिने जवळ येवून आईला उठविण्याचा प्रयत्न केला असता आई उठली नाही. यानंतर भुसावळ स्थानकावर गाडी थांबल्यावर गोविंद दुबे यांनी लोहमार्ग पोलिसांना प्रकार कळविला. त्यानुसार भुसावळ लोहमार्ग पोलीस पोलीस कॉस्टेबल समाधान कंखरे, पोलीस नाईक भरत पवार यांनी मृतदेह उतरवून रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात आणला. याप्रकरणी गोविंद दुबे यांच्या खबरीवरुन भुसावळ लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. डोळ्यादेखत आईच्या मृत्यूने एकुलती एक गीता हिचा मन हेलावणारा आक्रोश होता. दरम्यान माया हिची पती भेटीची इच्छाही अपूर्ण राहिली. माहिती मिळताच माया हिचे पती पुण्याहून जळगावकडे येण्यासाठी रवाना झाले आहेत.