जळगाव जिल्ह्यातील दोन बीडीओंची बदली

0

जळगाव- शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील वर्ग एकच्या अधिकाऱ्यांची बदली केली आहे. जिल्ह्यातील चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एम.के.वाघ आणि अमळनेर गटविकास अधिकारी ए.व्ही.पटाईत यांची बदली झाली आहे. वाघ यांची मालेगाव तर पटाईत यांची नंदुरबार गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाने बदलीचे आदेश जाहीर केले आहे.

सामान्य प्रशासन विभागाला  मिळाला अधिकारी
अमरावती गटविकास अधिकारी बी.एस.अकलाडे यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली आहे. नंदकुमार वाणी यांची बदली झाल्यानंतर हे पद गेल्या वर्षभरापासून रिक्त होते. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी राजन पाटील यांनी काही काळ अतिरिक्त अधिकारी म्हणून कामकाज पाहिले मात्र त्यांनी ही या विभागाचे अतिरिक्त पद सोडले त्यानंतर सध्य स्थितीत सामान्य प्रशासन विभागाचे कामकाज ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी बी.ए.बोटे पाहत होते.