नवी दिल्ली-ऑल इंडिया ट्रान्सपोर्टच्या वतीने विविध मागण्यांसाठी 20 जुलैपासून राज्यासह देशभरात चक्का जाम आंदोलन सुरू करण्यात आले होते. प्रामुख्याने टोल आणि थर्ड पार्टी इन्शुरन्ससंदर्भातील मागण्यांवर संघटनांचा भर होता. अखेर केंद्र शासनाच्या वतीने विविध मागण्यांवर तोडगा काढण्यात आला आहे. संप मिटविण्यात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि अर्थमंत्री पियुष गोयल यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
नवी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक आणि परिवहन भवनात बैठक पार पडली. बैठकीला केंद्रीय रस्ते विकास मनुष्यबळ मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री पीयूष गोयल, मलकन बल, कुलतरंगसिंग अग्रवाल, अमृतलाल मदान, प्रमोद भावसार, बाबा शिंदे उपस्थित होते. यात काही मागण्यांवर संमती दर्शविण्यात आली आहे. तसेच, अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांकरता थर्ड पार्टी इन्शुरन्स या मागणीवर आयआरडीएआय चर्चेसाठी तयार झाली आहे. त्याकरिता आयआरडीएआय आणि वाहतूकदारांची बैठक शनिवार, २८ जुलैला होणार आहे.